26 October 2020

News Flash

पुण्यात करोनाची बाधा होऊन २४ तासात ४६ मृत्यू तर पिंपरीत ३४ जणांचा मृत्यू

पिंपरीत ८३२ करोना रुग्णांची नोंद

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १३६४ नवे रुग्ण आढळल्याने, १ लाख ३४ हजार २९ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आजदिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार १६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १६४ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख १३ हजार ७८६ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ८३२ करोना बाधित रुग्णांची नोंद

पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने ८३२ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ९०५ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७१ हजार ६४१ वर पोहचली असून पैकी ५७ हजार ९१४ जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार १८८ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 10:36 pm

Web Title: 46 deaths in pune due to corona and 34 deaths in pimpri scj 81 svk 88 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 लोणावळा : कुत्र्याच्या मृत्यू प्रकरणी केअर टेकर विरोधात ‘या’ अभिनेत्रीने केली तक्रार
2 बारामतीत ४६ लाखांचा ३१२ किलो गांजा जप्त
3 निर्यातबंदी होऊनही कांदा दरातील तेजी कायम
Just Now!
X