पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ८१८ रुग्ण आढळल्याने, ५४ हजार २५५ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार ३१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ११८५ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ३५ हजार १२३ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरीत ९१३ रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोनाने थैमान घातले असून दिवसभरात ९१३ जण बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १२ करोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १९३ वर पोहचली आहे. पैकी, १२ हजार ५७५ जण करोनामुक्त झाले असून आज १३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ५२७ एवढी आहे.