05 March 2021

News Flash

Coronavirus: पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी होणार सील

संबंधित भागातील नागरिकांना आठवडाभराचे जीवनावश्यक साहित्य घेऊन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आठवडाभराचे साहित्य घेऊन ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

पुणे शहरातील कोंढवा, महर्षीनगर ते आरटीओ ऑफिस हा भाग पुढील आदेश येईपर्यंत सील राहणार आहे. त्यामुळे या काळात लागणारे जीवनावश्यक साहित्य नागरिकांनी आठवडाभरासाठी जमा करुन ठेवावे, अशा सूचना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत. या भागांमध्येच करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. भविष्यात इतर भागात रुग्ण आढळल्यास परिस्थिती पाहून ते देखील सील करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

जे भाग सील करण्यात येणार आहेत. त्यांमध्ये एकूण ३७ रुग्ण आढळून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 7:41 pm

Web Title: backdrop of corona virus different parts in pune city will be sealed for a week aau 85 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Lockdown: दीड महिन्याच्या बाळासह महिला आठ दिवसांपासून फुटपाथवर काढतेय दिवस
2 Coronavirus: शस्त्रक्रिया केलेला रुग्ण निघाला करोनाबाधित; डॉक्टरांसह ९२ जण क्वारंटाइन
3 Coronavirus : विद्यापीठाचे ६० हजार विद्यार्थी संचारबंदीत नागरिकांच्या मदतीला
Just Now!
X