निर्बंध शिथिल झाल्याने पुस्तकांची दालने उघडण्यास सुरुवात

पुणे : गेले पन्नास दिवस नवी पुस्तके , वाचनापासून दूर राहिलेल्या वाचकांना आता पुन्हा वाचनानंद मिळू शकणार आहे. पुस्तकांची दालने सुरू होऊ लागली असून, पुस्तकप्रेमी वाचकांची पावले पुस्तकांच्या खरेदीसाठी वळू लागली आहेत.

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सर्वसाधारण परिस्थितीमध्ये एप्रिल-मे महिन्यात पुस्तकांची प्रदर्शने आयोजित के ली जातात. त्यातून मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होऊन प्रकाशन व्यवसायाची मोठी उलाढाल होते. मात्र टाळेबंदीत पुस्तकांची दालने बंद झाली होती. त्यामुळे प्रदर्शने, खरेदी-विक्री ठप्प झाली. त्यातच ग्रंथालयेही बंद असल्याने पुस्तकप्रेमींना नवी पुस्तके  उपलब्ध होऊ शकली नाहीत. आता निर्बंध शिथिल होऊ लागल्याने पुस्तकांची दालने सुरू होऊ लागली आहेत.

अक्षरधाराचे संचालक रमेश राठिवडेकर म्हणाले, कोथरूडमधील दालन सुरू के ले आहे.  शासनाने सांगितल्याप्रमाणे सर्व निकष पाळून ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे. टाळेबंदीच्या काळात वाचकांकडून  मोठी मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार पुस्तके  कुरिअरद्वारे पाठवण्यात येतील. तसेच शहर परिसरातील वाचकांनी पुस्तकाची ऑनलाइन मागणी के ल्यास त्यांना पुस्तके  पुरवली जातील. ‘पुस्तकांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्याची गरज आहे. मद्याची दुकाने उघडली जातात, पण पुस्तकांची दालने उघडत नाही हे चांगले नाही. मात्र, आता दालन सुरू झाल्यापासून वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. संसर्ग टाळण्यासंदर्भातील काळजी घेतली जात आहे. पुस्तकांसह सॅनिटायझरची बाटली देण्यात येत आहे. करोनानंतरच्या काळातही पुस्तके  आणि प्रकाशन क्षेत्र निश्चितपणे बहरेल,’ असे पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी यांनी सांगितले.

आम्हाला वाचनाची आवड आहे. मात्र, टाळेबंदीत काहीच करता येत नव्हते. त्यामुळे खूप दिवसांनंतर पुस्तकांच्या दालनात गेल्यावर, पुस्तकांची मनसोक्त खरेदी के ल्यावर खूपच आनंद वाटला.

– ईश्वरी मत्स्ये