05 July 2020

News Flash

ग्लायडरचे हडपसरजवळ इमर्जन्सी लॅंडिंग, वैमानिक जखमी

हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरवरून या विमानाने उड्डाण घेतले होते

उड्डाणानंतर थोड्याच वेळात विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले.

पुण्यातील हडपसरजवळील मैदानामध्ये बुधवारी दुपारी ग्लायडिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. या घटनेत वैमानिक जखमी झाला आहे.
हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरवरून या विमानाने उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर थोड्याच वेळात विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने परिसरातील रिकाम्या मैदानावर इमर्जन्सी लॅंडिंग केले. वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोकळ्या मैदानात तातडीने विमान उतरविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दाट लोकवस्ती असलेल्या भागाजवळच ही घटना घडली. वैमानिकावर उपचार करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 5:14 pm

Web Title: emergency landing of a glider plane in pune
टॅग Emergency Landing
Next Stories
1 प्रसिध्दीच्या हव्यासापोटी तृप्ती देसाई यांचे आंदोलन
2 ‘लक्ष्य २०१७’ साठी स्वयंघोषित इच्छुकांकडून वर्षभर आधीच सामाजिक उपक्रमांचा सपाटा
3 महिला दिन कार्यक्रमास महापौरांसह महिला लोकप्रतिनिधींचीच दांडी
Just Now!
X