‘होम स्कूलिंग’विषयी माहिती जाणून घेणाऱ्या पालकांच्या संख्येत वाढ

पुणे : करोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे घरातूनच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू असल्याने पालकांमध्ये गृहशिक्षणाविषयी (होम स्कू लिंग) उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे गृहशिक्षणाची माहिती जाणून घेणाऱ्या पालकांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण गृहशिक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे यंदा जूनमध्ये शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक प्रक्रिया सुरू के ली आहे. मात्र संसर्ग आटोक्यात येऊन प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होणार याबाबत अद्याप शासनाकडून काहीच संके त देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी पालकांच्या मदतीने शाळेच्या ऑनलाइन वर्गात उपस्थित राहत आहेत.

पुण्यातील स्वअध्ययन या अनौपचारिक समूहाचे चेतन एरंडे म्हणाले, की गृहशिक्षणाची चौकशी करण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यात लक्षणीय वाढले आहे. गेल्या जेमतेम महिनाभरात ऐंशी ते शंभर पालकांनी गृहशिक्षणाची संकल्पना जाणून घेण्यासाठी संपर्क  साधला. माहिती घेतलेल्यांपैकी काही पालकांनी पाल्याच्या गृहशिक्षणाचा निर्णयही घेतला आहे. यंदा शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी शाळांकडून शुल्काची आकारणी के ली जात आहे, शाळेत पाठवण्यामागे पाल्य समवयीन मुलांमध्ये मिसळावा, त्याच्यावर सामाजिक संस्कार व्हावेत ही संकल्पना असते.

करोना संसर्गामुळे विद्यार्थी शाळेतच जाऊ शकणार नसल्याने हा उद्देश साध्य होणार नाही. त्याशिवाय काही पालकांची आर्थिक परिस्थिती अडचणीची झाली असल्याने त्यांना शुल्क भरणे शक्य नाही.

त्याशिवाय शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये मुलांच्या आरोग्याचीही चिंता आहे. तर अनेक पालकांना टाळेबंदीच्या काळात पाल्य घरी असल्याने त्याच्यातील कौशल्ये, क्षमता कळल्या. त्याच्या या

क्षमतांना प्रोत्साहन देण्याची त्यांना आवश्यकता वाटते. अशा काही कारणांनी पालक आता गृहशिक्षणाच्या पर्यायाचा विचार करू लागले आहेत.

गृहशिक्षणाविषयी पालकांमध्ये गैरसमज

गृहशिक्षणाकडे पालकांचा कल वाढत असल्याचे एप्रिलपासून दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये सुमारे तीनशे पालकांनी संपर्क  साधला. मात्र पालकांमध्ये गृहशिक्षणाविषयी गैरसमज असल्याचे जाणवले. घरातून शिक्षण आणि घरीच शिक्षण यात फरक आहे. तो पालकांना समजावून सांगावा लागला. गृहशिक्षण करताना एका पालकाने पूर्ण वेळ देणे आवश्यक असते. गृहशिक्षणात पाल्याच्या कलाने शिक्षणाची प्रक्रिया होते. के वळ करोनाच्या काळात पाल्य घरीच आहेत, ऑनलाइन पद्धतीने शिकत आहेत म्हणजे गृहशिक्षण होत नाही हे पालकांना समजावावे लागले. पालकांच्या माहितीसाठी आम्ही काही दृकश्राव्य चित्रफितीही तयार के ल्या आहेत, ब्लॉगही लिहीत आहोत, असे गृहशिक्षण देणाऱ्या पालक आणि मुंबई होम स्कू लर्स या अनौपचारिक समूहाच्या सदस्य अमृता जोशी-आमडेकर यांनी सांगितले.