03 March 2021

News Flash

जय अजित पवारही उतरणार राजकारणात?

जय पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक पिंपरीत लागल्याने एकच चर्चा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय अजित पवार हे राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पिंपरी-चिंचवड शहरात रंगते आहे. आज जय पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले असून यावर पवार कुटुंबीयांचे फोटो वापरण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे युवा नेतृत्व जय अजित पावर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे फलक शहरात लागल्याने चर्चेला उधाण आले आहे. या आधी जय पवार यांचे नाव असलेले फलक शहरात कधीच लागले नाहीत.

मावळ लोकसभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राजकारणात उतरले होते. परंतु, त्यांना त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, ज्या प्रकारे जय यांचे पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले आहेत त्यावरून तरी ते राजकारणात उतरतील अशी आशा येथील कार्यकर्त्यांना आहे. पार्थ पवार यांचे देखील लोकसभेच्या अगोदर अश्याच प्रकार चे पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले होते. त्यानंतर त्यांनी थेट अजित पवार यांच्या सोबत अनेक सभांना उपस्थिती लावत निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. सध्या शहरात लागलेल्या फलकावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो लागलेले दिसत आहेत.

जय पवार यांनी देखील अनेक बैठका घेऊन पार्थ पवार यांना मदत केली होती. अवघं पवार कुटुंब पिंपरी-चिंचवड शहरात ठाण मांडून बसले होते. परंतु, याचा फारसा परिणाम मतदारांवर झाला नाही. त्यामुळेच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला. येणाऱ्या काही कालावधीनंतर पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुसरे सुपुत्र जय पवार हे राजकारणात सक्रिय दिसल्यास काही आश्चर्य वाटायला नको. पिंपरी-चिंचवड शहरात आणि ग्रामीण परिसरात अजित पवार यांचा राजकीय मोठा दबदबा आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 3:53 pm

Web Title: jay ajit pawar is also set for political entry scj 81 kjp 91
Next Stories
1 पुण्यात कचरा प्रश्न पेटणार? चार दिवसांपासून सोसायट्यांमध्ये कचरा पडून
2 पिंपरी-चिंचवडमध्ये आढळल्या बॉम्ब सदृश वस्तू
3 Video : कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या आळंदीच्या ‘गुंड’ मुलीची कहाणी
Just Now!
X