पुणे-लोणावळा मार्गावरील प्रवाशांच्या अडचणी कायम

मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये पुणे ते लोणावळा या मार्गावर एकमेव उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध आहे. मात्र, लोकलच्या प्रवाशांचा प्राधान्याने विचार केला जात नसल्याने पुणे-लोणावळा लोकल नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. आवश्यकतेनुसार लोकलची संख्या वाढविणे आणि वेळापत्रक पाळण्याबाबतची मागणी पूर्ण होत नसल्याने प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत.

पुणे ते लोणावळा मार्गावर चार लोकलच्या माध्यमातून सेवा देण्यात येते. या लोकल दिवसाला ४४ फेऱ्या करतात. दररोज सुमारे एक लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेत असतात. पुणे, िपपरी-चिंचवड, तळेगाव, मावळ, लोणावळा या भागात रोजचा प्रवास कराव्या लागणाऱ्यांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे. प्रामुख्याने पुण्यात शिक्षणसाठी येणारे विद्यार्थी त्याचप्रमाणे पुणे, िपपरी, मावळ भागत नोकरीसाठी जाणाऱ्या चाकरमान्याकडून या सेवेचा प्रामुख्याने लाभ घेतला जातो. पुणे ते लोणावळा या पट्टय़ामध्ये मागील काही वर्षांमध्ये लोकवस्तीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकलवरील भार दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे लोकलची संख्या वाढवावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याबाबत प्रवासी संघटनांनी रेल्वे बोर्डपासून थेट मंत्रालयापर्यंत निवेदन दिले आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता काही वर्षांपूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या डब्यांची संख्या नऊवरून बारा करण्यात आली. मात्र, त्यानेही प्रश्न सुटलेला नाही. गाडय़ांची संख्या वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

लोकलचे वेळापत्रक हाही प्रवाशांच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय आहे. जाहीर वेळेनुसार कधीच लोकल धावत नसल्याचे वास्तव आहे. सकाळच्या काही गाडय़ांना नेहमीच उशीर होतो. दुपारनंतर अनेकदा वेळापत्रक कोलमडून पडलेले असते. संध्याकाळी पुण्याकडे येणाऱ्या सर्वच गाडय़ा नेहमी उशिराने धावत असतात. त्यामुळे लोकलच्या वेळेनुसार कुठे जायचे नियोजन केल्यास ते हमखास फिसकटते, असा अनुभव प्रवाशांकडून सांगण्यात येतो. पुणे-लोणावळा मार्गावर लांब पल्ल्याच्या गाडय़ांना प्राधान्य दिले जाते. त्यांच्या वेळेनुसार लोकल सोडल्या जातात. अनेकदा लोकल मध्येच कुठेतरी थांबवून ठेवत अन्य गाडय़ांना पुढे पाठविले जाते. त्यातून लोकलच्या प्रवाशांचा अक्षरश: छळच केला जातो आहे.

काही वर्षांपूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या डब्यांची संख्या नऊवरून बारा करण्यात आली. मात्र, त्यानेही प्रश्न सुटलेला नाही. गाडय़ांची संख्या वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

लोकलचे वेळापत्रक हाही प्रवाशांच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय आहे. जाहीर वेळेनुसार कधीच लोकल धावत नसल्याचे वास्तव आहे. सकाळच्या काही गाडय़ांना नेहमीच उशीर होतो. दुपारनंतर अनेकदा वेळापत्रक कोलमडून पडलेले असते. संध्याकाळी पुण्याकडे येणाऱ्या सर्वच गाडय़ा नेहमी उशिराने धावत असतात. त्यामुळे लोकलच्या वेळेनुसार कुठे जायचे नियोजन केल्यास ते हमखास फिसकटते, असा अनुभव प्रवाशांकडून सांगण्यात येतो. पुणे-लोणावळा मार्गावर लांब पल्ल्याच्या गाडय़ांना प्राधान्य दिले जाते. त्यांच्या वेळेनुसार लोकल सोडल्या जातात. अनेकदा लोकल मध्येच कुठेतरी थांबवून ठेवत अन्य गाडय़ांना पुढे पाठविले जाते. त्यातून लोकलच्या प्रवाशांचा अक्षरश: छळच केला जातो आहे.

कमी उंचीचे धोकादायक फलाट

पुणे-लोणावळा दरम्यान सर्व स्थानकावर १२ डब्यांची लोकल उभी करण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्याचे काम केले आहे. मात्र, काही स्थानकावर फलाटाची उंची अद्यापही वाढलेली नाही. स्थानकावर कमी वेळ लोकल थांबवली जाते. या कालावधीत स्थानकावर उतरणारे आणि चढणाऱ्या प्रवाशांची एकच धांदल उडते. त्यातून अनेकदा अपघातही होतात. प्रवाशांची नेहमीच वर्दळ असलेल्या  कामशेत आणि वडगाव या स्थानकावर फलाटची उंची अपुरी आहे. लोकल फलाटावर थांबल्यास लोकल आणि फलाट यामध्ये मोठे अंतर राहते. लोकलमध्ये चढताना पाय घसरल्याने प्रवासी त्यातून थेट लोहमार्गावर पडल्याचे प्रकार घडले आहेत.