News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘शिवसेने’च्या मदतीला धावून आली ‘मनसे’

निमित्त होते एका संगणकाचे

संग्रहित छायाचित्र

सतत एकमेकांविरोधात टीका टिपण्णी करणाऱ्या शिवसेना-मनसे नेत्यांच्या भुमिका असताना. पिंपरी-चिंचवड महापालिकेत आज चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेच्या मदतीला धावून आली. यासाठी निमित्त ठरले एक संगणक.

गेल्या ५ ते ६ दिवसांपूर्वी महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातील संगणक महापालिकेने काढून घेतला आहे. परंतू, असे का करण्यात आले यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे कुठलीही पूर्वसूचना न देता संगणक काढून घेण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र, लवकरात लवकर हा संगणक महापालिकेतील शिवसेना कार्यालयात बसविण्यात यावा व गटनेत्याना उचित सन्मान मिळावा यासाठी आज महापौरांना मनसे शहराध्यक्षांकडून निवेदन देण्यात आले. या एका शुल्लक कारणामुळे का होईना शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याचे आज पहायला मिळाले.

महापौरांना मनसे शहराध्यक्षांकडून निवेदन देण्यात आले.

शिवसेनेकडून पालिकेची निवडणूक लढलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर भाजपचा चुकीचा कारभार चव्हाट्यावर आणत आहेत. भापकर यासाठीची निवेदने आणि प्रेस नोट सेना कक्षातील संगणकावर तयार करत होते, म्हणूनच भाजपच्या आदेशावरून शिवसेनेच्या कक्षातून प्रशासनाने संगणक हटवला असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 9:46 pm

Web Title: mns came to help shivsena in pimpri chinchwad
Next Stories
1 आकुर्डीत रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू
2 पुण्यात पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानी चोरीचा प्रयत्न
3 चाकण येथे डोक्यात दगड घालून युवकाची हत्या
Just Now!
X