पुणे प्रतिनिधी,

मराठा आरक्षण मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “मराठा समाजाविरोधात ओबीसी समाजाला उभे करून दोघांमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम आखला जातोय. मंत्रिमंडळातील लोकांना हेच करायचे आहे का? उद्धव ठाकरे, तुम्हाला हे होऊ द्यायचं आहे का? आणि पवार साहेबांना हेच उघड्या डोळ्यांनी पाहायचे आहे?”, असा प्रश्न मेटे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

“तुझ्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात…”; संजय राऊतांवर भाजपा नेत्यांचा निशाणा

“महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या उपसमिती पदावरून हटविण्याच्या मागणीबाबत राज्यपालांची भेट घेण्यात आली आहे. तसेच या सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील मंत्रीपदाची जी शपथ घेतली आहे, त्याचा ते भंग करीत आहे. ते जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम करीत आहे. हे सर्व मुख्यमंत्री आणि सरकार चालविणारे उघड्या डोळ्याने पाहत आहेत. त्यामुळे वडेट्टीवार यांना मंत्रीपदावरून हटविण्यात यावे”, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

“सर्वोच्च न्यायालयात २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी होत आहे. सरकार काय तयारी करत आहे? कोणती व्यूहरचना आखत आहे? आता जे वकील आहेत, त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणते वकील शासन देणार आहे का?, याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि समाजाला विश्वासात घेऊन येणाऱ्या २५ तारखेच्या सुनावणीची तयारी करावी. तसेच सुनावणी होईपर्यंत व निकाल लागेपर्यंत पोलीस, वैद्यकीय, ऊर्जा, शैक्षणिक इत्यादि खात्यांतील नोकरभरती थांबविण्यात यावी”, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.