News Flash

मित्रांनी दिला दगा; मैत्रिणीचे फोटो वापरून फेसबुकवर तयार केले फेक अकाऊंट

२३ वर्षीय तरुणी ही चिखली येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे.तेथे आरोपी निरजकुमार आणि सुरेंद्रकुमार हे काम करत होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

खासगी कंपनीत काम करणाऱ्या जुन्या सहकाऱ्याने तरुणीचे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून तिच्या मित्रांना अश्लील मेसेज केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी दोन तरुणांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. नीरजकुमार सुरेशचंद कुमार आणि सुरेंद्र कुमार बाबूसिंग कुशवाह या आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय तरुणी ही चिखली येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे.तेथे आरोपी निरजकुमार आणि सुरेंद्रकुमार हे काम करत होते. तरुणी आणि आरोपी यांची ओळख असून ते मित्र होते. परंतु, कालांतराने दोन्ही आरोपीने नोकरी सोडली. याच कालावधीत नीरजकुमार आणि त्याचा साथीदार सुरेंद्रकुमार यांनी तरुणीच्या नावाने फोटोसह फेसबुक फेक अकाऊंट तयार केले. त्या अकाऊंटवरुन तरुणीच्या मित्रांना त्यांनी ‘मी तुझ्यावर प्रेम करते’ यासह अनेक अश्लील मेसेज केले. याविषयी संबंधित मित्राने तुझ्या अकाऊंट वरून अश्लील मेसेज आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तरुणीला तिच्या नावाने कोणीतरी बनावट अकाऊंट तयार केल्याचे उघड झाले. हा प्रकार तब्बल एक महिना सुरू होता. शेवटी तरुणीने थेट चिखली पोलीस ठाणे गाठत याविषयी माहिती दिली. त्यात हे दोन ओळखीचे आरोपी समोर आले असून त्यांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 4:58 pm

Web Title: office colleague create fake fb profile of girl sent vulgar message to her friend
Next Stories
1 Pulwama Terror Attack : ही वेळ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची – अमोल कोल्हे
2 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एफएसआय, टीडीआरची खैरात
3 बारावी परीक्षेच्या काळात शिक्षकांचे असहकार आंदोलन
Just Now!
X