पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैद्य असल्याचा दावा केलाय. काळजे यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेबाबत उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. एप्रिल महिन्यात समितीने सादर केलेल्या अहवालावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत, चार महिन्यात नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा अहवाल तयार करण्यात आलाय. यावर आता लवकरच सुनावणी होईल. तसेच तक्रारदाराला या अहवालावर आक्षेप घेण्याची मुभा देखील आहे. त्यामुळं महापौर काळजे यांच्यावरील टांगती तलवार अद्याप कायम आहे.

नितीन काळजे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील व घनश्याम खेडकर यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी काळजे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यासह इतर कागदपत्रेही सादर केली. याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने नव्याने जातपडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार, हे प्रकरण जात पडताळणी समिती, पुणे यांच्याकडे आले होते. काळजे यांनी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवले असल्याचा आरोप करत त्यांच्या जातीच्या आला होता. काळजे यांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरले तर त्यांचे महापौरपद जाऊ शकते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.