पिंपरी: पिंपरी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने रावेत येथील जलउपसा केंद्रातील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, त्यासाठी गुरुवारी (२९ जुलै) शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा होऊ शकेल. सायंकाळी मात्र शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा होणार नाही.
दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी (३० जुलै) होणारा पाणीपुरवठा अपुरा व अनियमित स्वरूपाचा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2021 रोजी प्रकाशित
पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा उद्या सायंकाळी बंद
पिंपरी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने रावेत येथील जलउपसा केंद्रातील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-07-2021 at 04:01 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad water supply to be cut off tomorrow evening ssh