शहरात दररोज १५० बस नादुरुस्त; नियमित देखभाल-दुरुस्तीचा अभाव

उच्च दर्जाच्या सुटय़ा भागांची कमतरता, नियमित देखभाल दुरुस्तीचा अभाव, कुशल मनुष्यबळाची कमतरता आदी कारणांमुळे पीएमपी बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दररोज सरासरी दीडशे बस रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याचे चित्र अलीकडच्या काही दिवसांत पुढे आले आहे. सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या पीएमपीच्या बस ऐन रस्त्याच नादुरुस्त होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आणि वाहतूक कोंडीतही भर पडते. त्यामुळे सार्वजनिक सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पीएमपी बस भर रस्त्यात बंद पडण्याच्या प्रकारांचा अलीकडच्या काही महिन्यात कहर झाला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल दहा हजार वेळा बस नादुरुस्त झाल्याची माहिती पीएमपीने दिली आहे. मात्र हे प्रमाण कमी होण्याऐवजी मार्च महिन्यापासून मोठय़ा प्रमाणावर वाढले असल्याचे चित्र आहे. मार्च महिन्यापर्यंत दररोज सरासरी १०० ते ११० गाडय़ा बंद पडत होत्या. मात्र हे प्रमाण आता १३५ ते १५० असे झाले आहे. यातही ठेकेदाराकडील गाडय़ा नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरासाठी पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. दररोज किमान आठ लाख प्रवासी पीएमपीतून प्रवास करतात. बस नादुरुस्त होत असल्यामुळे वेळप्रसंगी प्रवाशांना गाडीला धक्का देऊन ती सुरू करण्याचे काम करावे लागते.

प्रवाशांची संख्या लक्षात घेता पीएमपीकडे मुळातच बसची संख्या अपुरी आहे. पीएमपीच्या ताफ्यात ठेकेदाराच्या आणि पीएमपीच्या मालकीच्या मिळून दोन हजारांच्या आसपास बस आहेत. त्यातही काही कारणांमुळे काही बस मार्गावर येऊ शकत नाहीत. या परिस्थितीमध्ये बस बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसतो.

पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे असताना पीएमपीच्या गाडय़ा नादुरुस्त होण्याचे प्रमाण घटले होते. आगारातून बस संचलनात आणण्यापूर्वी ती सुस्थितीत आहे का, हे पाहण्याची सक्ती करण्यात आली होती. चालक-वाहक आणि आगारातील अधिकाऱ्यांवर त्यासाठी जबाबदारीही निश्चित करण्यात आली होती. गाडी नादुरुस्त झाल्यास किंवा तशी तक्रार आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होत होती. त्यामुळे बस नादुरुस्त होण्याचे प्रमाणही कमी झाले होते. तसेच ब्रेकडाऊनचे प्रमाण शून्य टक्क्य़ांपर्यंत आल्याचा दावाही करण्यात आला होता.

प्रवासी वाऱ्यावर

पीएमपीचा कार्यभार डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे असताना दैनंदिन उत्पन्नातील काही वाटा गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनीही गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीवर विशेष भर दिला होता. चालक-वाहकांवर गाडय़ांची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. सुटे भाग उच्च दर्जाचे असावेत, यासाठी काही निकषही निश्चित करण्यात आले होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते. मात्र सध्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे गाडय़ा नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पीएमपी प्रवासी वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.