22 January 2021

News Flash

पुणे : सलाईनच्या बाटलीत आढळलं शेवाळ; डॉक्टरांच्या वेळीच लक्षात आल्यानं टळला धोका

संबंधित कंपनीच्या सलाईनमध्ये अनेकदा शेवाळ आढळलं असून बंदी घालण्याचा इशारा

पिंपरी : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे एका खासगी दवाखान्यात सलाईनच्या बाटलीत शेवाळ आढळून आलं.

पुणे जिल्ह्यातील एका खासगी दवाखान्यात सलाईनमध्ये शेवाळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेळीच एका डॉक्टरच्या हा प्रकार लक्षात आल्याने पुढील धोका टळला. संबंधित औषध निर्मिती कंपनीच्या सलाईनमध्ये अनेकदा शेवाळ आढळल्याचे डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष शिंदे यांनी सांगितलं. तसेच या कंपनीच्या सलाईनवर बंदी घालण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला सलाईन चढवताना ही धक्कादायक बाब समोर आली. संबंधित डॉक्टरच्या हे लक्षात आल्यानं त्यांनी रुग्णाला दुसरं सलाईन लावलं. परंतू, संबंधित औषध निर्मिती कंपनीद्वारे असा हलगर्जीपणा होतोच कसा? असा प्रश्न करीत आंबेगाव तालुक्यात संबंधित सलाईनवर बंदी घालण्याचा इशारा आंबेगाव तालुका संघटनेद्वारे देण्यात आला आहे. वेळ आलीच तर या कंपनीवर कायदेशीर कारवाई देखील करू असंही त्यांनी म्हटलं आहे.

मंचरमधील डॉ. संतोष शिंदे यांच्या रुग्णालयात तातडीने एका रुग्णाला सलाईन लावायचं होतं. तेव्हा, हा गंभीर प्रकार समोर आला. चुकून ते सलाईन रुग्णाला लावलं गेलं असतं तर त्याचे गंभीर परिणार रुग्णांवर झाले असते आणि विनाकारण डॉक्टरची नाहक बदनामी झाली असती असे डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष या नात्याने डॉ. संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, संबंधित सलाईन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, तो होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 8:05 pm

Web Title: pune algae found in saline bottle the danger was averted as it was noticed by the doctor aau 85 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे निधन
2 अधिकाऱ्यांच्या परस्पर निर्णयाने गोंधळ
3 टाळेबंदीत सायबर चोरटे सक्रिय
Just Now!
X