सध्याचं युग हे सोशल मीडियाचं झालेलं आहे…सामान्य जनतेशी संपर्कात राहण्यासाठी आजकाल पोलिस यंत्रणाही सोशल मीडियावर सतर्क असतात. अनेकदा सोशल मीडियाच्या सहाय्याने संकटात सापडलेल्या व्यक्तींची मदत झालेली आपण पाहिली आहे. पुणे पोलिसांनी नुकतच, आपल्या हजरजबाबीपणाचा नमुना दाखवत सर्वांची मनं जिंकली आहेत.

ट्विटर हँडलवर एका मुलीने पुणे पोलिसांना धानोरी पोलिस ठाण्याचा नंबर मागितला.

पुणे पोलिसांनीही या मुलीची मदत करत तिला तात्काळ धानोरी पोलिस ठाण्याचा नंबर उपलब्ध करुन दिला.

पुणे पोलिसांच्या या उत्तरावर, एका नेटकऱ्याने…सर मला त्या मुलीचा नंबर मिळेल का?? असा प्रश्न विचारला.

ज्यावर पुणे पोलिसांनीही इरसाल उत्तर देत, मुलीचा नंबर मागणाऱ्या नेटकऱ्याला गोड शब्दांत समज दिली.

पुणे पोलिसांच्या या उत्तरावर नेटकरी चांगलेच खुश झालेले पहायला मिळाले.

गेल्या अनेक प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला हजरजबाबीपणा दाखवला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री, ड्रग्जविषयी माहिती विचारणाऱ्या एका व्यक्तीलाही पुणे पोलिसांनी अशाच खास स्टाईलमध्ये उत्तर दिलं होतं.