अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागांत पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. सुरुवातीचे दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात, तर त्यानंतर १५ डिसेंबपर्यंत विदर्भात पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी कोकण विभागात मुंबईसह बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात पुण्यासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस कोसळला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १२ आणि १३ डिसेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मात्र या दोन्ही दिवशी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गारांच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १४ आणि १५ डिसेंबरला प्रामुख्याने विदर्भात पाऊस होणार आहे.

ram kadam rohit pawar
Video: फडणवीसांना संपवण्याची धमकी, रोहित पवारांचा फोन आणि बारामती कनेक्शन; सत्ताधाऱ्यांचे विधानसभेत गंभीर आरोप!
imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
crop damage in vidarbha marathwada and north maharashtra due to unseasonal rain hailstorm
अवकाळी, गारपिटीमुळे पिके आडवी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात प्रचंड नुकसान

पाऊस या भागांत..

उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्य़ांतील काही भागांत पुढील दोन दिवस गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. १२ आणि १३ डिसेंबरला पुणे, नगर, सातारा या भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर आदी जिल्ह्य़ातही या दोन दिवसांत हलका पाऊस असणार आहे. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत विदर्भात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

हवाभान..

अरबी समुद्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. समुद्रावरून बाष्प येत असल्याने राज्यातील वातावरण ढगाळ झाले असून, काही ठिकाणी हलका पाऊसही कोसळतो आहे. या घडामोडींमध्ये थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी आता रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या पुढे गेले असून, मध्य महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते १० अंशांनी वाढल्याने हलका उकाडाही जाणवतो आहे.