News Flash

धक्कादायक! : मामाकडून अकरा वर्षीय भाचीवर बलात्कार

चाकण येथील घटना, आरोपीला अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मावस मामानेच आपल्या अकरा वर्षीय भाचीवर बलात्कार केला आहे. चाकण पोलिसांना आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २४ वर्षीय आरोपी मामा आणि पीडित मुलीचे कुटुंब हे एकच परिसरात राहतात. तसेच जवळचे नाते असल्याने आरोपी पीडित मुलीच्या घरी वेळोवेळी येत असे. या आरोपी मामाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या अकरा वर्षीय भाचीवर अतिप्रसंग केला होता. घरात कोणी नसताना असे कृत्य करून, कोणाला सांगू नये यासाठी त्याने या चिमुरडीला धमकीही दिली होती. मात्र, मुलीने आईला सांगितले त्यामुळे हा सुन्न करणारा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी काल (२८ जुलै) रोजी पीडित मुलीच्या आईने आपल्या मावस भावा विरोधात चाकण पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 2:08 pm

Web Title: uncle raped our 11 years niece shocking incident happened at chakan
Next Stories
1 माती वाहिली, मग भराव टाकले.. तेही खचले!
2 शहरातील नाटय़गृहांमधील स्वच्छतागृहे चकाचक
3 शहराच्या तापमानात मोठी वाढ
Just Now!
X