scorecardresearch

VIDEO: चौकशीच्या निमित्ताने चोर जवळ आला, गळ्यातील दागिने ओढले, अन् १० वर्षाच्या मुलीने…”

पुण्यात रस्त्यावरून जाणाऱ्या एका आजीबाईंच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा साखळीचोराचा प्रयत्न १० वर्षांच्या नातीने उधळून लावला.

Pune Chain Snatching VIDEO
पुणे साखळीचोरीचा प्रयत्न..

पुण्यात रस्त्यावरून जाणाऱ्या एका आजीबाईंच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा साखळीचोराचा प्रयत्न १० वर्षांच्या नातीने उधळून लावला. साखळीचोर आजीच्या गळ्यातील दागिने ओढत असल्याचं दिसताच या १० वर्षाच्या मुलीने धाडसीपणे तिच्या हातातील बॅगने चोरावर हल्ला चढवला. आजी आणि या मुलीच्या प्रतिकारामुळे चोराला काही वेळ प्रयत्न करूनही दागिने घेता आले नाही. त्यामुळे अखेर त्याला तसाच पळ काढावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यात आजी आपल्या दोन नातींबरोबर रस्त्यावरून जात होत्या. त्याचवेळी समोरून एक दुचाकीस्वार आला आणि तो पत्ता विचारण्याच्या निमित्ताने आजींच्या जवळ आला. त्याने बोलायला सुरुवात केली आणि यानंतर आजींनीही तो करत असलेल्या चौकशीला प्रतिसाद देत त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली.

व्हिडीओ पाहा :

याच संधीचा फायदा घेत या साखळचोराने आजींच्या गळ्यातील दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर आजी सावध झाल्या आणि त्यांनी साखळीचोराचा प्रतिकार केला. अचानकपणे आजीवर झालेला हा हल्ला त्यांच्यासोबत रस्त्याच्या फुटपाथवरून चालणाऱ्या १० वर्षीय नातीने पाहिला. तिने तात्काळ प्रसंगावधान राखत तिच्या हातातील बॅगने साखळीचोरावर हल्ला चढवला.

चोराने आधी प्रतिकार करत दागिने ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजींसह नातीनेही चोरावर हल्ला चढवल्याने चोर भांबावला आणि त्याने दागिने न चोरताच पळ काढला. या प्रकारानंतर १० वर्षीय मुलीच्या धाडसाचं चांगलंच कौतुक होत आहे.

हेही वाचा : …अन् दोन सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; दिल्लीत ५ मजली इमारत कोसळली, थरकाप उडवणारा VIDEO

दरम्यान, हा प्रकार २५ फेब्रुवारी रोजी घडला. या प्रकरणी गुरुवारी (९ मार्च) गुन्हा दाखल झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून १० वर्षीय मुलीच्या धाडसाची जोरदार चर्चा आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 09:15 IST