राजकीय पक्ष फोडण्याच्या पद्धतीसंदर्भात भाजपबद्दल लोकांची पूर्वीची जी मते होती ती आता बदलायला लागली आहे. जवळपास ३० टक्के भाजपचे काँग्रेसीकरण झाले आहे. आता उरलेले सगळे गेले की भाजपची काँग्रेस लवकरच होईल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली. हा विनोद आहे असे समजू या. पण, मुद्दाम म्हणून सांगतो गंमत म्हणून… अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

जयंत पाटील यांनी कसबा गणपतीसह मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. कसबा गणपती मंडळ येथे उत्सव मंडपातच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या वेळी उपस्थित होते.अनेक नेते पक्ष सोडत असल्याच्या बातम्यांसदर्भात बोलताना पाटील म्हणाले, सत्ता ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे कामे करून घेण्यासाठी जावे लागते. याचा अर्थ सगळेच पक्ष सोडायला लागले आहेत, असा गैरसमज पसरवणे योग्य नाही. अशोक चव्हाण यांच्याकडे इतका मोठा वारसा आहे. ते काही वेगळा विचार करतील, असे मला वाटत नाही. अनेक खडतर प्रसंग आले तेव्हाही विश्वजित कदम यांच्या वडिलांनी काँग्रेस सोडली नाही. मला खात्री आहे तेही काँग्रेस सोडणार नाहीत.
या देशाची सत्ता हुकूमशाही प्रवृत्तीच्या हातामध्ये जात आहे या निष्कर्षावर देशातील सर्व पक्ष कमी-अधिक प्रमाणात आले आहेत.

हेही वाचा : पुणे : गणेशोत्सवात १९ ठिकाणी पार्किंगची सुविधा

देशातील सर्वच व्यवस्था पूर्णपणे झाकोळल्या आहेत. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकत्रित येण्याची भावना वाढीस लागली असून ही प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली दिसते, अशा शब्दांत पाटील यांनी भाष्य केले.शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात पाटील म्हणाले, दसरा मेळावा हा शिवसेनेचाच. बाळासाहेब ठाकरे ज्या बाजूला असतात तो खरा दसरा मेळावा. निवडणुकांमध्येही हे चित्र स्पष्ट होईल. दसरा मेळावा ही बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली परंपरा आहे. ही परंपरा उद्धवजी देखील अनेक वर्षे सांभाळत आहेत. हा दसरा मेळावा महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना दिशा देणारा ठरेल. चिन्हाचे काय होईल ते सांगता येत नाही. पण, दसरा मेळावा हा ठाकरे कुटुंबाचाच असेल, अशी मला खात्री आहे.

हेही वाचा : पुणे : गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिकेची तयारी पूर्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नौदलाच्या झेंड्याचा सार्थ अभिमान

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली पहिले नौदलाचे आरमार उभारले गेले. भारत वर्षात पहिल्यांदा नौदल करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून झाले. नौदलाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करताना पंतप्रधानांनी शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.