पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजता पाडणार ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती | According to Collector Dr. Rajesh Deshmukh flyover in Chandni Chowk will be demolished on October 2 at 2 am pune print news amy 95 | Loksatta

पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजता पाडणार ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून, दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजता हा उड्डाणपूल जमीनदोस्त केला जाणार आहे.

पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजता पाडणार ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून, दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजता हा उड्डाणपूल जमीनदोस्त केला जाणार आहे. त्यासाठी उड्डाणपुलापासून २०० मीटरचा परिसर हा निमर्नुष्य केला जाणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : गॅस सिलिंडरमधून गळती स्फोटात महिला जखमी ; नऱ्हे भागातील घटना

नोएडा येथील ‘ट्वीन टॉवर’ ही बेकायदा इमारत पाडण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा वापर हा उड्डाणपूल पाडण्यासाठी केला जाणार असून, त्यासाठी पुलाला १३०० छिद्रे पाडण्यात आली आहेत. ६०० किलो स्फोटकांद्वारे हा उड्डाणपूल पाडला जाणार आहे.हा उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन करण्यासाठी संबधित सर्व विभागांतील अधिकाऱ्यांबरोबर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हेही वाचा >>> पुणे : अतिवृष्टी बाधितांसाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त

ते म्हणाले की, चांदणी चौकातील उड्डाणपूल हा दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजता पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. एक ऑक्टोबरला रात्री अकरा वाजल्यापासून ते दोन ऑक्टोबरला सकाळी आठपर्यंत या मार्गातील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पिंपरी: सुधारित आराखड्याच्या कामाला गती द्यावी ; खासदार बारणे यांची आयुक्तांना सूचना

संबंधित बातम्या

पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
पुणे: कोणाच्या चुकांमुळे उद्योग बाहेर गेले?
पुणे: कोथरुडमधील पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार; लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक
राज ठाकरेंनी पुन्हा बोलून दाखवली मतं मिळत नसल्याची खंत? निवेदन घेऊन आलेल्यांना म्हणाले, “आम्ही फक्त…”
राज्यपालांना पदमुक्त करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक संकेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके
पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा
पुणे: कोथरुड भागात गांजा विक्री एकास अटक; साडेसात किलो गांजा जप्त
पुणे: शिवाजीनगर, डेक्कन परिसरात गुरुवार, रविवार वीजपुरवठा बंद
सुनेमुळे बीसीसीआय अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; रॉजर बिन्नी यांना बजावली नोटीस