पिंपरी – चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चौफेर फटकेबाजी करत जोरदार भाषण केल आहे. ज्या नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स जास्त त्यांच आगामी निवडणुकांमध्ये बटन दाबू नका. असा सल्ला अजित पवारांनी पिंपरी- चिंचवडकरांना दिला आहे. आता हा टोला नेमका कोणाला आहे. यावरून चर्चा रंगली आहे. फ्लेक्समुळे अपघात होतात. छान फलक असल्यास त्याकडे वाहनचालक बघतो आणि अपघात होतो. अस ही अजित पवारांनी म्हटलं आहे. ते पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून- मधून बीड चा दौरा काढत जा. त्यामुळं शहर स्वच्छ होत. शहर स्वच्छ झालं की समजायचं अजित पवार येत आहेत. अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली. पुढे ते म्हणाले, एक वेळ स्वच्छतेवरून स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्यावर चिडलो होतो. ते मला स्वच्छते संदर्भात सांगायचे. पण ते सिंगापूरमध्ये एक आणि मुंबई विमानतळावर वेगळं वागायचे. पुढे ते म्हणाले, परदेशात आपण नियम पाळतो. मग आपल्या देशात का? नाही. तिथं कचरा टाकला की चक्की पिसावी लागते.
पुढे ते म्हणाले, बारामतीत अनधिकृत फ्लेक्स लावू नका. अस आम्ही परिपत्रक काढलं आहे. ज्याने फ्लेक्स लावला आणि ज्याचे ते फ्लेक्सचे बांबू आहेत. त्या दोघांवर गुन्हा दाखल केला जात आहे. तसा त्यांचा बंदोबस्त केला जातो. पिंपरी- चिंचवड शहरात ही तस धोरण राबवा. अस आवाहन अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केलं. मग तो फ्लेक्स देवेंद्र भाऊ यांच्या असो की अजित पवारांचा. काही जण स्वतःचा फोटो मोठा दिसावा म्हणून आमचे फ्लेक्स लावतात.
जो जास्त काम करतो, त्याचे फ्लेक्स कमी असतात आणि जो कामच करत नाही. त्याचे फ्लेक्स जास्त असतात. आता फ्लेक्स जास्त त्याच बटन दाबू नका. असा सल्ला अजित पवारांनी पिंपरी- चिंचवडकरांना दिला आहे. पुढे ते म्हणाले, प्लास्टिकवर बंदी आणावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगत आहे. प्लास्टिकमुळे पुरात चोअप होत. लोणावळा, माथेरान इथं प्लास्टिक बंदी आहे. प्लास्टिकमधील पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी घातक आहे. आजार उद्भवतात अस ही अजित पवारांनी सांगितलं.