scorecardresearch

सराफावर शस्त्राने वार करून दरोड्याचा प्रयत्न चोरट्यांच्या हल्ल्यात सराफ जखमी, कात्रज भागातील घटना

सराफी पेढीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरट्यांनी पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

सराफी व्यावसायिकावर चाकूने वार करून भरदिवसा दरोडा टाकण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक भागात घडली. चोरट्याने केलेल्या हल्ल्यात सराफ जखमी झाला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत.

चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात सराफ विनोदकुमार सोनी (वय ४२, रा. आंबेगाव बुद्रुक) जखमी झाले आहेत. सोनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनी यांची आंबेगाव बुद्रुक परिसरात वैभवलक्ष्मी ज्वेलर्स सराफी पेढी आहे. सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी अचानक सोनी यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. सोनी यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केला. सोनी यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरटे सराफी पेढीसमोर लावलेल्या वाहनातून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सराफी पेढीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरट्यांनी पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempt to rob a gold trader in katraj pune print news asj