जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणानंतर बीआरटी मार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी ७४ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चाला महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा जुना पुणे-मुंबई महामार्ग सर्वाधिक वाहतूक असलेला रस्ता आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सहा वर्षे रखडले होते. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ता रुंदीकरणासाठी संरक्षण विभागाने २.१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली होती. अंडी उबवणी केंद्रापासून हॅरीस पुलापर्यंत ४२ मीटर रुंदीचा रस्ता केला जाणार आहे. सध्या हा रस्ता २१ मीटर रुंदीचा आहे. संरक्षण विभागाने महापालिकेला जागा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मार्गावरील काही ठिकाणी खासगी जागा मालकांकडून जमिनींचे संपादन करण्यात आले आहे.

हेही वाचा:पुणे विद्यापीठात गणेश अथर्वशीर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

त्यामुळे रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर या मार्गावर बीआरटी मार्ग सुरू करण्यात येणार आहे. बीआरटी मार्ग सुरू करण्याचा आणि त्याच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीला देण्यात आला होता. त्याला प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brt route developed on old pune mumbai highway approval of expenditure 74 crores pmc pune print ews tmb 01
First published on: 26-11-2022 at 11:24 IST