लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: उन्हाळ्यात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे आणि गोरखपूर दरम्यान विशेष शुल्कासह विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

विशेष गाडी पुण्यातून २१ एप्रिल ते १६ जूनदरम्यान सोडली जाणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी ९ वाजता पोहोचेल. ही गाडी गोरखपूरमधून २२ एप्रिल ते १७ जूनदरम्यान सोडली जाणार आहे. तेथून ही गाडी दर शनिवारी रात्री ११.२५ वाजता सुटेल आणि पुण्यात तिसऱ्या दिवशी सकाळी ७.१५ वाजता पोहोचेल.

हेही वाचा… ‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांवर लोणावळ्यात छापा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गाडीसाठी आरक्षण विशेष शुल्कासह गुरुवारपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. या गाडीचे सर्वसाधारण द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून चालविण्यात येतील. प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी करोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.