पुणे : होळीनिमित्त उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी या गाड्या सोडण्यात येणार आहेत.

पुणे-दानापूर-पुणे

पुणे- दानापूर सुपरफास्ट विशेष गाडी २१ मार्चला पुण्याहून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता दानापूरला पोहोचेल. दानापूर – पुणे स्पेशल एक्स्प्रेस २२ मार्चला दानापूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ७.४५ वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीला हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा हे थांबे असतील.

हेही वाचा…बारामती : आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का? श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांचा सवाल

पुणे-गोरखपूर-पुणे

पुणे- गोरखपूर सुपरफास्ट विशेष २२ मार्चला पुण्याहून सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता गोरखपूरला पोहोचेल. गोरखपूर – पुणे सुपरफास्ट विशेष २३ मार्चला गोरखपूरहून रात्री ११.२५ वाजता सुटेल आणि २५ मार्चला सकाळी ६.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, बाराबंकी, गोंडा, मानकापूर जंक्शन, बस्ती आणि खलीलाबाद हे थांबे असतील.

पुणे–मुझफ्फरपूर–पुणे

पुणे- मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष गाडी २५ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान दर सोमवारी पुण्याहून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि मुझफ्फरपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल. मुझफ्फरपूर – पुणे सुपर फास्ट एसी विशेष दिनांक २३ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान दर शनिवारी मुझफ्फरपूर येथून रात्री ११.१५ वाजता सुटेल आणि पुण्याला सोमवारी सकाळी ५.३५ वाजता पोहोचेल. या गाडीला हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलिपुत्र आणि हाजीपूर हे थांबे असतील.

हेही वाचा…पुणे : निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर? इनकम टॅक्सचे आता आहे २४x७ लक्ष…..

पुणे-संबळपूर-पुणे

पुणे-संबळपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस १९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत दर मंगळवारी पुण्याहून सकाळी ९.१५ वाजता सुटेल आणि संबळपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. संबळपूर – पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत दर रविवारी संबळपूर येथून रात्री १० वाजता सुटेल आणि पुण्याला मंगळवारी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कंटाबांजी , टिटलागड, बालनगीर आणि बरगढ़ रोड हे थांबे आहेत.

हेही वाचा…इंदापूर हत्या प्रकरण: मैत्रिणीला भेटायला आलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला!

पुणे-जबलपूरला मुदतवाढ

पुणे-जबलपूर विशेष एक्सप्रेस या दर सोमवारी धावणाऱ्या साप्ताहिक गाडीची सेवा दिनांक १ एप्रिल पर्यंत सुरू राहणार होती. आता या गाडीचा कालावधी १ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच दर रविवारी धावणाऱ्या जबलपूर-पुणे विशेष एक्सप्रेस साप्ताहिक गाडीची सेवा ३१ मार्चऐवजी ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे.