पुणे : पुणेकर हुशार आहेत, एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर गाडीची हवा काढतात. विरोधकांचीही हवा काढून नक्कीच हवा काढणार आहेत, असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सुरू होती. त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा…सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी विनंती केल्याने बारामतीमध्ये उमेदवार दिला नाही, प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट

शिंदे म्हणाले, की महाराष्ट्रातल्या सभा रेकॉर्डब्रेक होत आहेत. महाराष्ट्र मोदींवर प्रेम करतो. राम मंदिर स्वप्नवत वाटत होते, पण राम मंदिर उभे राहिले. काश्मीरला देशाला जोडले. काँग्रेसने साठ वर्षांत देश बुडवला. मोदींनी पाण्याखाली देशासाठीच प्रार्थना केली. ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही. तर देशाचा सन्मान वाढवणारे मोदी विरुद्ध देशाची नाचक्की करणारे राहुल गांधी अशी लढाई आहे.

हेही वाचा…खेडमध्ये डॉ. कोल्हे आणि आढळराव-पाटील दोघांनीही धरले एकमेकांचे पाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात पाच लाख कोटींची गुंतवणूक दावोसमधून आली. दहा वर्षांत विकास विरुद्ध साठ वर्षांत भ्रष्टाचार. दहा वर्षांत एकही बॉम्बस्फोट नाही आणि एकही भ्रष्टाचार नाही. ही अस्मितेची, प्रगतीसाठीची निवडणूक आहे. मोदींजीचीच गॅरेंटी चालते. विरोधकांकडे भ्रष्टाचाराची नीती आहे. मोदींजीकडे देशाला महा सत्ता करण्याची दूरदृष्टी आहे. मोदींनी १० कोटी जनतेला घरे दिली, असे शिंदे म्हणाले. पुणेकर हुशार आहेत, एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर गाडीची हवा काढतात. विरोधकांचीही हवा काढून नक्कीच हवा काढणार आहेत, असेही शिंदे म्हणाले.