पुणे : कोथरुडमध्ये दहशत असलेला गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली. मारणेने पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मारणेने पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मारणेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारणे टोळीची कोथरुड, तसेच शहरात दहशत आहे. मारणेचे पत्नी जयश्री या मनसेच्या नगरसेविका होत्या. मारणेने पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मारणे आणि त्याची पत्नी जयश्री उपस्थित होते.

हेही वाचा : शिरूर लोकसभेच्या मैदानात पार्थ पवार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपक मानकर, माजी नगरसेवक दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मारणे याच्या भेटीमुळे कोथरुडमधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत आहेत.