लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासात ५.३८ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत.

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडून रिंगणात आहेत. पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

आणखी वाचा-मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी बजाविला मतदानाचा हक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या दोन तासात सर्वाधिक उरणमध्ये ६.४८ टक्के मतदान झाले. पनवेलमध्ये ५.२३ टक्के कर्जत ५.१५ टक्के, चिंचवड ६.०९ टक्के, पिंपरी ४.३३ टक्के आणि मावळ विधानसभा मतदारसंघात ३.४१ टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात ५.३८ टक्के मतदानाची नोंद झाली.

विधानसभा मतदारसंघांनुसार मतदारसंख्या

  • पनवेल : ५ लाख ९१, ३९८
  • कर्जत : ३ लाख ९,२०८
  • उरण : ३ लाख १९, ३११
  • मावळ : ३ लाख ७३,४०८
  • चिंचवड : ६ लाख १८,२४५
  • पिंपरी : ३ लाख ७६,४४८
  • एकूण : २५ लाख ८५ हजार १८