पुणे : देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू करताना काही अडचणी आल्या. त्यावर मात करीत आता संकलनाचा विक्रमी टप्पा गाठला आहे. जीएसटी संकलनात महाराष्ट्राचे योगदान २० टक्के म्हणजेच सुमारे दोन लाख ७० हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे, असे मत राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) जीएसटी व अप्रत्यक्ष कर समिती आणि पुणे शाखेच्या वतीने जीएसटी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यात ते बोलत होते. या वेळी समितीचे अध्यक्ष सीए उमेश शर्मा, संस्थेच्या केंद्रीय समिती सदस्य चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे उपाध्यक्ष यशवंत कासार, विभागीय समिती सदस्या ऋता चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हेही वाचा – Panvel-Nanded Express : पुण्यात चक्क झुरळांमुळे काही तास रखडली रेल्वे, पाहा Video

हेही वाचा – पुणे : आघाडीचे उद्योजक म्हणताहेत, ‘एआय’बद्दल आताच सांगता येणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनगंटीवार म्हणाले, की करप्रणालीत सुलभता आणण्यासाठी भारतासारख्या खंडप्राय देशात जीएसटी प्रणाली लागू करण्यात आली. त्या वेळी काही अडचणी आल्या. मात्र, त्यावर मात करून देशाने १३ लाख ७० हजार कोटी रुपयांचे जीएसटी संकलन केले आहे. त्यातून एक देश, एक करप्रणाली, एक बाजारपेठ अनुभवायला मिळत आहे. जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सनदी लेखापालांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन जीएसटी परिषदेसह सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांना पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यात तर्कसंगत बदल घडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.