पुणे : पावसात दुचाकी घसरल्याने पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. प्रतीक विठ्ठल पवार (वय २३, रा. फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा – पुणे : तरुणींची छेड काढणारा ‘बकासूर’ अटकेत; कोयता जप्त

हेही वाचा – आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ;अवघ्या तीन दिवसात १६०० पेक्षा अधिक मुलांना लागण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुचाकीस्वार प्रतीक फुरसुंगी भागातील खुटवड चौकातून निघाला होता. त्या वेळी खुटवड चौकात वळण घेताना पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यात चिखल झाला होता. चिखलात दुचाकी घसरली आणि दुचाकीस्वार प्रतीक पडला. त्या वेळी भरधाव पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून प्रतीकचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहे. प्रतीकच्या मागे आई आणि बहीण असे कुटुंब आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.