scorecardresearch

Premium

पुणे : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेला बंदुकीचा धाक

महिला बाणेर रस्ता परिसरातील एका उपाहारगृहाजवळून निघाली होती. त्यावेळी गाडेने तिला अडवले.

woman threatened with a gun, woman threatened for immoral relationship news in marathi
पुणे : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेला बंदुकीचा धाक (संग्रहित छायाचित्र)

पुणे : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेशी अश्लील वर्तन करुन तिला बंदुकीचा धाक दाखविण्यात आल्याची घटना बाणेर परिसरात घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत अनंत गाडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गाडेविरुद्ध विनयभंग, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : दोन तासांचे काम अवघ्या ४० मिनिटांत, पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील वाहतूक वेळेआधीच सुरू

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
Heavy Vehicles, Banned, Pune Nagar Road, During Rush Hours, Metro and Flyover Construction,
पुणे : नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळेत जड वाहनांना बंदी
gangsters challenge to police in Dhule two village guns are seized from terrorist
धुळ्यात गुंडांचे पोलिसांना आव्हान, दहशत माजवणाऱ्याकडून दोन गावठी बंदुका जप्त

तक्रारदार महिला आणि गाडे ओळखीचे आहेत. महिला बाणेर रस्ता परिसरातील एका उपाहारगृहाजवळून निघाली होती. त्यावेळी गाडेने तिला अडवले. तिच्याशी अश्लील वर्तन करुन अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. महिलेने त्याला नकार दिला. तेव्हा गाडेने मोटारीत ठेवलेली बंदुक दाखविली. तुझ्यासह कुटुंबीयांना जीवे मारु अशी धमकी गाडेने दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune at baner woman threatened with a gun for immoral relationship pune print news rbk 25 css

First published on: 07-12-2023 at 14:39 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×