पुणे : भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. अपघातात टेम्पोतील क्लिनर गंभीर जखमी झाला.

ईश्वर बाळासाहेब उगले (वय ३४, रा. गोगलगाव, ता. राहता, जि. अहिल्यानंगर ) असे मृत्युमुखी पडलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. अपघातात टेम्पोतील क्लिनर सुनील किशोर नेहे (वय २२, रा. डिग्रस, ता. राहता, जि. अहिल्यानगर) जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत ट्रकचालक विक्रम विठ्ठल बाबर (वय ३७, रा. डोंगरगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील लोणीकंद भागातून रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव टेम्पो निघाला होता. त्या वेळी भरधाव टेम्पो ट्कवर पाठीमागून आदळला. अपघातात टेम्पोचालक उगले आणि क्लिनर नेहे हे गंभीर जखमी झाले. अपघातात टेम्पो, तसेच ट्रकचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भरधाव टेम्पो चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी लोणींकद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कात्रज घाटात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

कात्रज घाटात भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२८ जून) रात्री घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास नारायण आखुटे (वय५६, रा. संभाजीनगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अंदाजे ३५ ते ४० वर्षदरम्यान आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करत आहेत.