शिरूर : मलठण , ता . शिरुर येथील १९ वर्षाच्या युवकाने राहत्या घरी गळाफास घेवून आत्महत्या केली आहे .तन्मय रामदास कदम वय -१९ वर्षे, रा. मलठण ता. शिरूर जि. पुणे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास सत्तू कदम वय ४२ वर्षे व्यवसाय शेती रा. मलठण ता. शिरूर जि. पुणे. यांनी याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला दिली आहे .

२ मार्च रोजी रात्री सव्वाबाराचा दरम्यान तन्मय हा गावातील वरातीला जावून घरी झोपण्यासाठी आला व शेजारील खोली मध्ये दार लावून झोपला होता त्यानंतर ३ मार्च रोजी दुपारी रामदास कदम यांनी मुलगा तन्मय याला तो झोपलेल्या खोलीचा दरवाज्या वाजून गोठ्यातील फॅन चालू कर म्हणून आवाज दिला होता परंतू त्यांने काही एक आवाज दिला नाही. त्यानंतर तन्मय याचा भाउ ऋषभ यांने दुपारी जनावरांना खादय आण्यासाठी गाडीची चावी घेण्यासाठी तन्मय झोपला त्या खोलीचा दरवाजा वाजवला असता तन्मय यांने खोलीचा दरवाजा उघडला नाही म्हणून ऋषभ यांने खोलीचे खिडकी उघडून आत डोकावून पाहिले असता तन्मय यांने खोलीचे लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले . ऋषभ यांने आवाज देवून वरील प्रकार वडिल रामदास यांना सांगितला . ते खोलीचा दरवाज्या तोडून आत गेले असता मुलगा तन्मय यांने खोलीचे लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबतची माहिती पोलीसांना दिल्यावर पोलीस तिथे आले . तन्मय यास ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले . तेथे डॉक्टरानी तपासून तन्मय हा मृत पावल्याचे सांगितले . याबाबत आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गर्कळ करीत आहेत.