सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक पात्रता शुल्क, समकक्षता तपासणी शुल्क आणि स्थलांतर प्रमाणपत्र (मायग्रेशन) मिळण्यासाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. ही शुल्कवाढ पन्नास ते शंभर रुपये असून, येत्या १ ऑगस्टपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक पात्रता विभागाकडून शुल्कवाढीबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. समकक्षता तपासणी शुल्कासाठी पाचशेऐवजी सहाशे रुपये, शैक्षणिक पात्रता तपासणी शुल्कांतर्गत अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्यातील विद्यार्थ्यांकडून तीनशे ऐवजी साडेतीनशे रुपये, परराज्यातील विद्यार्थ्यांकडून पाचशे ऐवजी सहाशे रुपये, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्यातील विद्यार्थ्यांकडून पाचशे ऐवजी सहाशे रुपये, परराज्यातील विद्यार्थ्यांकडून एक हजार ऐवजी अकराशे रुपये, तर स्थलांतर प्रमाणपत्रासाठी पाचशे ऐवजी सहाशे रुपये आकारले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ही शुल्कवाढ करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.गेल्या दहा वर्षांत शुल्क वाढ केलेली नव्हती. प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे कामकाज वाढल्याने खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे या खर्चापोटी शुल्कवाढ करण्यात आल्याचे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी स्पष्ट केले.