लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : जमीन खचून ‘जेटिंग व्हॅन’ खड्ड्यात गेलेल्या ब्रिटिशकालीन मध्यवर्ती टपाल कार्यालयाच्या (सिटी पोस्ट) आवारातील जागेची शनिवारी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तोपर्यंत खड्ड्याची जागा बंदिस्त करण्यात आली असून, तेथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
indian-constituation
संविधानभान: जातनिहाय जनगणनेची आवश्यकता

टपाल विभागाच्या शहर पश्चिम विभागाचे सहायक अधीक्षक सुदाम साबळे यांनी ही माहिती दिली. ब्रिटिशकालीन वास्तूमध्ये मध्यवर्ती टपाल कार्यालय गेल्या ९९ वर्षांपासून कार्यरत आहे. पुढील वर्षी या वास्तूची शताब्दी साजरी होणार आहे, असे साबळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-‘खड्ड्यांत’ गेलेल्या पुण्यात खड्डा बुजविण्यावरून ‘खड्डाखड्डी’!

बेलबाग चौकातील मध्यवर्ती टपाल कार्यालयाच्या आवारातील मलनिस्सारण वाहिनी सफाईसाठी आलेली महापालिकेची जेटिंग व्हॅन जमीन अचानक खचल्याने २५ फूट खड्ड्यात अडकली. प्रसंगावधान राखून चालकाने उडी मारल्याने तो बचावला. दरम्यान, जमीन खचल्याच्या संदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तोपर्यंत खड्ड्याची जागा बंदिस्त करण्यात आली असून, तेथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती सुदाम साबळे यांनी दिली.

जमीन खचून वाहन कोसळलेल्या या खड्ड्यातील पाणी स्वच्छ आहे. त्यामुळे येथे पूर्वी विहीर असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हा खड्डा बुजवायचा की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. -सुदाम साबळे, सहायक अधीक्षक, शहर पश्चिम विभाग

आणखी वाचा-पुणे : दोन आरोपींकडून पाळत ठेवून वनराज आंदेकर यांचा खून

रस्ते का खचतात, याची प्रत्येक ठिकाणी विविध कारणे असू शकतात. शहरात इमारती बांधताना पाण्याचे नैसर्गिक झरे बुजविण्यात येतात. ते पाणी कोणत्या ना कोणत्या मार्गांने बाहेर पडत असते. त्यातून रस्ते खचण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे झरे अबाधित ठेवण्याची गरज आहे. सिटी पोस्ट येथील घटनेमागील कारण आत्ताच सांगता येणार नाही. ही इमारत ब्रिटीशकालीन इमारत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात नैसर्गिक झरे मोठ्या प्रमाणात आहेत. -विवेक खरवडकर, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

सिटी पोस्टाजवळ घडलेला प्रकार हा खासगी मालमत्तेत झालेला आहे. त्याचा महापालिकेशी काहीही संबध नाही. या परिसरात जुनी विहीर असावी, त्यावर हे बांधकाम केलेले असेल. हे बांधकाम कोणी आणि कधी केले, याची कोणतीही माहिती, नकाशा पोस्टाच्या कार्यालयाकडे नाही. या भागातील गटार तुंबले असल्याची तक्रार आल्यानंतर महापालिकेची जेटिंग व्हॅन दुरुस्तीसाठी गेली होती. काम पूर्ण करून गाडी बाहेर पडत असताना हा प्रकार घडला. -अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

मध्यवर्ती टपाल कार्यालयाच्या आवारात जमीन खचून ट्रक आत पडण्यामागे भूगर्भीय असे कारण दिसत नाही. त्या ठिकाणी पूर्वी विहीर वगैरे असावी. मात्र, त्यावर केलेले बांधकाम योग्य प्रकारे न केल्याने ही खचण्याची घटना घडलेली असू शकते. या बाबत अधिक अभ्यास करावा लागेल. -डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ