‘दिल्ली समोर कधी झुकायच नाही’, ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली आहे. “झुकेंगे नहीं लढेंगे…और जीतेंगे भी” असे म्हणत राज्यमंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे. ते तळेगाव येथे जाहीर सभेमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करताना दिसत आहे. त्यावरून जयंत पाटील यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. 

“…म्हणून सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदाची संधी आम्ही सोडून दिली;” जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

जयंत पाटील म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मावळात त्यांनी आम्हाला शिकवण दिली. झुकायच नाही, वाकायचं नाही, लढायचं. शेवट पर्यंत लढत असताना आपल्या महाराष्ट्रात दिल्लीश्वराने नेहमी कपट कारस्थान केली. दिल्लीचा हुकूमशाहा किती ही कावेबाज असला तरी महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकनार नाही. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली आहे,” असं पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्राचं सरकार यांना डोळ्यात सलत आहे. महाराष्ट्रातील सरकार मोडून काढण्यासाठी सर्व मार्ग अवलंब करण्याची यांची तयारी आहे. आमदारांना अमिष दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी त्यांनी हे प्रयत्न केले. पण, काही होत नसल्याने त्यांनी मंत्र्यांवर धाडी घालण्याचं काम सुरू केलं आहे. अनिल देशमुखांची यांना काय अडचण होती. त्यांची काय चूक होती, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केलाय.  तसेच हे सुडाचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या बद्दल गैरसमज पसरवण्याचं काम भाजपा करत आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.