पिंपरी- चिंचवड : ठाकरे कुटुंबाच आणि कोळी बांधवांच आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा देवीच्या मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. सात जुलै पासून ड्रेस कोड ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुकानदार आणि स्थानिकांसाठी देखील हा नियम लागू असणार आहे. याबाबतच आई एकवीरा देवीच्या संस्थानकडून पत्रक काढण्यात आल आहे.

तोकडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून आल्यास भाविकाला मंदिरात प्रवेश देणार नाहीत असं संस्थांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. ड्रेस कोड पाळणे हे बंधनकारक असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. महिला, तरुणी, पुरुष, युवक यांच्यासाठी हा नियम लागू असणार आहे.

महिलांना मंदिरात प्रवेश करायचा असल्यास त्यांनी साडी, सलवार, कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपारिक कपडे परिधान करावेत. महिलांचे पूर्ण अंग झाकलेले असावे. हाच नियम तरुणींसाठी देखील आहे. तर पुरुषांनी आणि युवकांनी धोतर- कुर्ता, पायजमा- कुर्ता, पॅन्ट- शर्ट, टी-शर्ट किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे परिधान करावेत. पुरुषाचे पूर्ण अंग झाकलेल असावं असं देखील पत्रकात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय परिधान करू नये

तरुण आणि तरुणींनी शॉर्टस, शॉर्ट स्कर्ट, वेस्टन कपडे, मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स, हाफ पॅन्ट किंवा अंग प्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. अशी कपडे कुणी परिधान करून आढळल्यास त्या भक्ताला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ड्रेस कोड हा बंधनकारक आहे. अशी माहिती आई एकविरा देवीच्या संस्थानकडून करण्यात आली आहे.