लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मतदान होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. त्यातही मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरी भागात राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मतदान होते, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा यांनी मंगळवारी पुण्यात दिली. तसेच शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी
CM Eknath Shinde
शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”
uddhav thackeray amit shah latest news
Maharashtra News : “अमित शाहांना एवढंच सांगायचंय की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत…”, उद्धव ठाकरेंचा ‘त्या’ विधानावरून टोला!

पुण्यातील यशदा येथे आयोजित स्वीप समन्वय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत अजमेरा बोलत होते. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरिष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा या वेळी उपस्थित होत्या. या वेळी जिल्ह्यांच्या स्वीप समन्वय अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात स्वीप अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत सादरीकरण केले.

आणखी वाचा-मावळमधून ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

मतदान जागृतीचे उपक्रम साजरे करण्यापुरता मर्यादित असलेला स्वीप उपक्रम मतदानविषयक माहितीचे विश्लेषणानुसार करायच्या उपाययोजनांपर्यंत पोहोचला आहे. आता मतदानाची टक्केवारी, मतदारांचा सहभाग कमी पडू नये याला महत्त्व आले आहे. त्यासाठी कमतरता शोधून त्याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. मतदानाची राष्ट्रीय सरासरी ६७.४ टक्के आहे. मात्र बिहारमध्ये ५७.३ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५९.२ टक्के, तर महाराष्ट्रात ६१.२ टक्के मतदान होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण अशा शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे दिसून येते. राज्यात २२ मतदारसंघांत ६० ते ६५ टक्के मतदान होते, तर ६५ टक्क्यांच्या वर मतदान असलेले १० मतदारसंघ आहेत. सुशिक्षित, युवा मतदार मतदानाकडे पाठ फिरवतात.

शहरी नागरिकांच्या वर्तनशास्त्राबाबत केलेल्या अभ्यासातून मतदानासाठी प्रवास करण्याची मानसिकता नसणे, मतदान दिवस हा सुटीचा दिवस मानण्याची मानसिकता समोर आली. ही मानसिकता बदलणे, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांवर भर देण्याची आवश्यकता आहे, असे अजमेरा यांनी सांगितले.

आणखी वाचा-सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये १५१ मतदान केंद्रे

कमी मतदान असलेला जिल्हा किंवा मतदारसंघस्तरावर स्वीप कार्यक्रम मर्यादित ठेवता कामा नये. कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून तेथील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. निवडणूक आयोग जनजागृतीसाठी आता मतदान कमी असलेल्या राज्यापर्यंतच नव्हे, तर कमी असलेल्या शहरांपर्यंत पोहोचला आहे. कमी मतदान केंद्रापर्यंत पोहोचून तेथे ९० टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. सुशिक्षित नागरिकांच्या मतदानाप्रति उदासीनतेमुळे शहरांत कमी मतदान होत आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विविध प्रयत्न होत असून, राज्यात मुंबई, पुणे, ठाणे या शहरांत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये १५१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.