पुणे : भारतातील तूरटंचाईचा आणि जगभरातील तुरीच्या अल्प उपलब्धतेचा फायदा घेत मोझांबिकने भारताला होणाऱ्या तूर निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. अतिरिक्त नफ्यासाठी मोझांबिक भारताची ‘तूरकोंडी’ करण्याच्या प्रयत्नात आहे. देशांतर्गत बाजारात पुढील वर्षभर तुरीच्या दरात तेजी राहणार असली, तरीही फारशी दरवाढ होण्याची शक्यता नाही.

इंडियन पल्सेस ॲण्ड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले, की मोझांबिक भारताला तूर निर्यात करणारा सर्वांत मोठा देश आहे. देशाच्या एकूण आयातीत मोझांबिकचा वाटा ४० टक्के आहे. मागील आर्थिक वर्षी मोझांबिकमधून ४.६० लाख टन तुरीची आयात झाली होती. चालू आर्थिक वर्षात आजपर्यंत सुमारे दोन लाख टनांची आयात झाली आहे. जागतिक बाजारात तुरीची उपलब्धता कमी आहे. देशातील किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १९० रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत. या टंचाईच्या स्थितीचा फायदा घेण्यासाठी मोझांबिकने आपल्या तूर निर्यातीत घट केली आहे. मोझांबिक सरकारमधील काही अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी मिळून फक्त एकाच व्यापाऱ्यामार्फत निर्यात सुरू केली आहे. वाढीव दराने भारताला तूर निर्यात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”

हेही वाचा : सहायक प्राध्यापक पदासाठीची सेट परीक्षा ७ एप्रिलला; परीक्षेत आता होणार मोठा बदल

तूर तेजीत; पण अतिरेकी दरवाढ नाही

यंदा देशात तूर लागवडीत घट झाली आहे. कमी पाऊस, गारपीट, अवकाळी सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. देशातील तूर डिसेंबर महिन्यात बाजारात येईल. म्यानमारमध्येही तुरीची काढणी सुरू झाली असून, म्यानमारची तूर जानेवारी महिन्यात देशाच्या बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. त्या शिवाय मालावी, इथोपिया आदी आफ्रिकी देशांतूनही आयातीचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील वर्षभर दरातील तेजी कायम राहणार असली तरीही, तुरीच्या दरात अतिरेकी दरवाढ होण्याची शक्यता नाही. एकूण जागतिक उपलब्धता आणि देशांतर्गत उत्पादनाचा अंदाज पाहता वर्षभर तुरीची हातातोंडाशी गाठ राहणार आहे.

हेही वाचा : प्रेमविवाहाची इच्छा अधुरी, ट्रकचालकाचा अपघाती मृत्यू; तरुणी गंभीर जखमी

अन्य देशांतून आयातीचा पर्याय

अवेळी पावसामुळे नुकतेच तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. देशात यंदा तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जगभरातील अन्य देशांतही तुरीचे उत्पादनही कमी झाले आहे. संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा जास्त दराने म्हणजे बाजारभावाने तूर खरेदी करून साठा करीत आहे. पुढील वर्षभर तुरीची टंचाई राहण्याचा अंदाज आहे. या स्थितीची मोझांबिक सरकारला जाणीव असल्यामुळे ते अतिरिक्त फायद्यासाठी नियंत्रित निर्यात करताना दिसतात. मलावी, म्यानमार, इथिओपियातून तुरीची आयात करण्याचा पर्याय खुला आहे, अशी माहिती शेतीमाल बाजारभावाचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर यांनी दिली.