Mumbai Live News Updates, 28 July 2025 : पुण्यातील खराडी येथील एका हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून केलेल्या कारवाईत अमली पदार्थ, दारू, हुक्का याचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचाही समावेश आहे. दरम्यान, आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही, असे हवामान विभागाने सांगितले आहे. तर नागपूरच्या वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतूकीच्या सुलभ वाहतूक व्यवस्थेसह सर्व भागांना जोडणाऱ्या उत्तम वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वसमावेशक गतीशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे.
तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.
Pune Nagpur Mumbai Breaking News Live Updates in Marathi
कोल्हापूर : नृसिंहवाडीत तिसरा दक्षिणद्वार सोहळा; शिवालये गजबजली
कृष्णा, वारणा नदीला पूर; औदुंबर दत्त मंदिरात पाणी; अलमट्टीतून सव्वालाख क्युसेकचा विसर्ग
नदीकाठचे रस्ते पाण्याखाली; खडकवासला धरणातील विसर्गात वाढ; नागरिकांना सावधानतेचा इशारा
फडणीसांच्या चित्रांमध्ये कला, कल्पनांचा अनोखा मेळ; मंगला गोडबोले यांचे मत
पर्यटनस्थळांवर गर्दी व्यवस्थापन यंत्रणा; जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद
जुन्या उपकरप्राप्त इमारतींना म्हाडाने बजावलेल्या ९३५ नोटिसा बेकायदा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पिंपरी महापालिकेचा आकृतिबंध दोन वर्षांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत; ४ हजार ७३१ जागा रिक्त
दिल्लीतील धर्तीवर ‘पीएमपी’चे १७०० स्मार्ट बसथांबे; ‘बीओटी’ तत्त्वानुसार बांधण्याचे नियोजन
वाहतूक पोलीस ठरला ‘देवदूत’; दांपत्याला सावध केल्याने अपघातातून बचावले
राज्यात पावसाचा जोर ओसरणार
तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल… नवीन काय असणार?
धारावीत गोळीबार; हाताला गोळी लागल्याने महिला गंभीर जखमी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
आंबेडकरी विचारांवर आधारित ‘कवन’चे पृथ्वीमध्ये प्रयोग रंगणार
मुंबईतील २० वर्दळीची ठिकाणे फेरीवाल्यांच्या गर्दीतून मुक्त होणार; महापालिकेकडून लवकरच...
शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा दावा; पुरंदर विमानतळासाठी जागा देण्याच्या संदर्भात ग्रामस्थांचे म्हणणे...
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आक्षेपार्ह वक्तव्याने वादात; आदिवासी मंत्री, समाजाबद्दल माफी मागण्याची वेळ
उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचे केवळ ६७ प्रकल्पच मार्गी लागणार; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ३८ प्रस्ताव अडकले...
पिंपरी महापालिकेचा लिपिक ३३४ दिवसांपासून गैरहजर; विभागीय चौकशीचा आयुक्तांचा आदेश
महिला बँक कर्मचाऱ्याशी गैरवर्तन भोवले; एकाला एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा
पार्सलची जबाबदारी चालक-वाहकांवर; एसटी महामंडळाचा निर्णय
पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा आग्रह, त्याचे राजकारण कशाला? ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचा सवाल
नवी मुंबई विमानतळ हद्दीतील मांस विक्रीवर डीजीसीएची टांगती तलवार
ठाकरे एकत्र आल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे अशी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी खासदाराची टीका
गळके छप्पर दुरूस्त करायला गेला आणि प्राणाला मुकला; छप्परावर प्लास्टिक टाकणारा १७ वर्षीत तरूण विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी
मालमत्तेच्या वादातून भावावर चाकूचा हल्ला; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल कधी? राज्य मंडळाने दिली माहिती…
निसर्ग उन्नत मार्गाचे तिकिट व्हॉट्सॲपवरूनही काढता येणार
अभ्युदयनगरचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर; निविदेला दुसऱ्यांदा दोन आठवड्यांची मुदतवाढ
ठाण्यातील मराठी शाळा बंद होणार?… पालकांनी घेतली शाळा व्यवस्थापनाची भेट, शाळा व्यवस्थापन म्हणाले….
एकनाथ शिंदे यांचा हट्ट फडवीसांनी पुरविला; ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केला शिंदे यांचा हा आवडता अधिकारी ..
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २८ जुलै २०२५