पिंपरी : रेडझोनने प्रभावित असलेल्या तळवडेत जैवविविधता उद्यान (बायोडायव्हर्सिटी पार्क) विकसित करण्यात येणार आहे. ६० एकर जागेत हे उद्यान साकारण्यात येणार आहे. त्यासाठी ७६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. स्वच्छतेची कामे करणाऱ्या भारत विकास ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला (बीव्हीजी) हे काम देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. 

हेही वाचा >>> महापालिकेला स्वतःची खासगी मालमत्ता समजू नका, आयुक्तांना कोणी सुनावले खडे बोल…

तळवडे भाग रेडझोन प्रभावित आहे. त्यामुळे विकासकामे आणि पायाभूत सोईसुविधा देण्यात अडचणी येत होत्या. रेडझोन हद्दीतील ६० एकर गायरान जागेत जैवविविधता उद्यान साकारण्याचे निश्चित केले. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. यात चार ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यांपैकी एक ठेकेदार पात्र ठरला. त्यामुळे महापालिकेने फेरनिविदा मागविली. त्यात भारत विकास ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची एकमेव निविदा आली. त्यांनी दरापेक्षा ०.१० टक्के कमी दराची निविदा सादर केली. त्यांची ७५ कोटी ९३ लाख ८८ हजार रुपयांची निविदा स्वीकारण्यास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली. कामाची मुदत १८ महिने आहे. उद्यानात वेगवेगळ्या वनस्पती, दुर्मीळ औषधी झाडे व वेली, देशी जातीची झाडे, फळ व फूलझाडांची लागवड केली जाणार आहे. प्राणी, पक्षी अधिवास निर्माण करण्यात येणार आहे. शिवाय, पर्यटकांसाठी ट्रॅक, खाद्यपदार्थांचे स्टॉल, मनोरंजनाची साधनेही असणार आहेत.

हेही वाचा >>> चांदीवाल आयोग सार्वजनिक न केल्यास सरकारला न्यायालयात खेचणार; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरण प्रदूषण वसुंधरेचा ऱ्हास रोखण्याचे आव्हान मानवजातीसमोर आहे. चिखली-मोशी-चऱ्होली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आहेत. पर्यावरणाचा समतोल टिकावा त्यासाठी जैवविविधता उद्यान उभारण्यात येत असल्याचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया म्हणाले, की जैवविविधता उद्यान मानव आणि निसर्ग यांच्यातील अधिक शाश्वत आणि सामंजस्यपूर्ण सहअस्तित्वाचा मार्ग प्रकाशित करेल. पुनर्संचयित उपक्रम, शैक्षणिक कार्यक्रम आणि सामुदायिक सहभाग याद्वारे पार्क जागरूक पर्यावरणीय कारभाराच्या परिवर्तनीय शक्तीचे उदाहरण देईल.