पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. नंदकिशोर पतंगे वय- ३१ अस मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळं पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या एक वर्षापासून पिंपरी पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे हे पिंपरी पोलीस ठाण्याच्या मोहन नगर चौकी येथे कार्यरत होते. त्यांना दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू झाले, हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. पण, उपचारादरम्यान आज त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं पिंपरी-चिंचवड पोलीसांनी हळहळ व्यक्त केली आहे. पतंगे यांचं वय अवघ ३१ वर्ष होतं. त्यामुळं पुन्हा एकदा पोलिसांच्या फिटनेस चा विषय समोर आला आहे.