लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी, मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार असल्याने त्या दिवशी मतदार संघात सुट्टी दिली जाणार आहे.

आणखी वाचा-खिशावर आर्थिक ताण; पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांनाही लागू असणार आहे. तसेच राज्य, केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, इतर संस्था यांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.