पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी महिन्यात मालवाहतुकीतून २८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये वाहनांच्या सर्वाधिक ४८ मालगाड्यांची वाहतूक झाली असून त्याखालोखाल पेट्रोलियम उत्पादनांच्या ३२ मालगाड्यांची वाहतूक झाली आहे. मात्र, साखरेची वाहतूक केवळ १८ मालगाड्या असूनही उत्पन्नात पहिला क्रमांक लागला आहे.

पुणे विभागाला जानेवारी महिन्यात मालवाहतुकीतून एकूण २८.०५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. जानेवारीत पुणे विभागातून १२१ मालगाड्या पाठविण्यात आल्या. त्यात सर्वाधिक ५६ मालगाड्या वाहनांच्या होत्या. त्यातून रेल्वेला १०.३१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांच्या २६ मालगाड्या पाठविण्यात आल्या आणि त्यातून रेल्वेला ३.११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यानंतर इतर वस्तूंच्या २६ मालगाड्या पाठविण्यात आल्या असून, त्यातून १ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. साखरेच्या १८ मालगाड्या पाठविण्यात आल्या आणि त्यातून सर्वाधिक १३.६३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

Strawberry Season end due to Water Shortage
पाण्याअभावी स्ट्रॉबेरीचा हंगाम आटोपला
pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Highest production of mustard in the country this year pune news
देशात यंदा मोहरीचे उच्चांकी उत्पादन? १२०.९० लाख टन उत्पादनाचा अंदाज

हेही वाचा…पुणे : रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार जाणून घ्या…

पुणे विभागात प्रामुख्याने वाहन उद्योग, पेट्रोलियम उत्पादने, साखर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुणे विभागात गूळ मार्केट (कोल्हापूर), मिरज, सांगली, सासवड रस्ता, लोणी, चिंचवड, बारामती, लोणंद, कराड, सातारा, खडकी, फुरसुंगी हे १२ मालधक्के आहेत. त्यातील गूळ मार्केट, मिरज, सांगली, बारामती, लोणंद, कराड, सातारा या मालधक्क्यांवरून साखर पाठविली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यामुळे रेल्वेतून साखर वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. ही साखर प्रामुख्याने ईशान्य भारतात पाठविली जाते, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा…शरद मोहोळच्या खून प्रकरणातील आरोपींच्या मोबाइलमध्ये १९ हजार ८२७ ऑडिओ क्लिप…’ही’ धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने येतात. यामुळे रेल्वेतून साखरेची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने ही साखर ईशान्य भारतात पाठविली जाते. त्यामुळे जानेवारीतील मालवाहतुकीत साखरेचे प्रमाण केले असले तरी लांबच्या अंतरामुळे त्यातून जास्त महसूल मिळाला. – डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे