scorecardresearch

स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा ; १७ जणांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई

या कारवाईत पोलिसांनी ३० हजार २७० रुपयांची रोकड, १३ मोबाइल संच, जुगाराचे साहित्य असा एख लाख १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा ; १७ जणांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई
संग्रहित छायाचित्र

पुणे : स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्डा चालविणाऱ्यासह १७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.स्वारगेट परिसरात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी ३० हजार २७० रुपयांची रोकड, १३ मोबाइल संच, जुगाराचे साहित्य असा एख लाख १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जुगार अड्ड्याच्या चालकासह १७ जणांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलमान्वये स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, हनुमंत कांबळे, संदीप कोळगे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या