scorecardresearch

Premium

माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७५ वर

दरड कोसळून झालेल्या माळीण दुर्घटनेतील मृतांची संख्या शनिवारी ७५ वर जाऊन पोहचली. शनिवारी सकाळी मातीच्या ढिगाऱ्याखालून माळीण गावातील आणखी पाच दुर्दैवी रहिवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७५ वर

दरड कोसळून झालेल्या माळीण दुर्घटनेतील मृतांची संख्या शनिवारी ७५ वर जाऊन पोहचली. शनिवारी सकाळी मातीच्या ढिगाऱ्याखालून माळीण गावातील आणखी पाच दुर्दैवी रहिवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या ७५ इतकी झाली असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी १०० जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ३७ महिला आणि दहा लहान मुलांचा समावेश आहे.
सतत कोसळणारा पाऊस आणि मातीचा चिखल यामुळे हे मृतदेह काढणे, त्यांचे शवविच्छेदन करणे, ओळख पटवणे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे ही सारी प्रक्रिया अतिशय जिकिरीची होऊन बसली आहे. परिणामी या परिसरात असह्य़ दुर्गंधी दाटू लागली असून गावातील अन्य रहिवासी तसेच मदतकार्यात करणारे जवान व नागरिक यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. बचावकार्य पूर्ण होण्यास आणखी २-३ दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रु. देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2014 at 01:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×