scorecardresearch

Premium

पुणे : पीएमपीचे आजपासून दोन नवे मार्ग

हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक आणि मुंढवा चौक ते केसनंद फाटा या दोन नव्या मार्गांवर शुक्रवारपासून पीएमपीची सेवा देण्यात येणार आहे.

Pune PMPML Buses, PMPML Buses 2 new routes
पुणे : पीएमपीचे आजपासून दोन नवे मार्ग (संग्रहित छायाचित्र)

पुणे : हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक आणि मुंढवा चौक ते केसनंद फाटा या दोन नव्या मार्गांवर शुक्रवारपासून पीएमपीची सेवा देण्यात येणार आहे. रेल्वेच्या प्रवाशांसाठी हे दोन मार्ग सुरू करण्यात आले असून, आठवड्यातील रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी ते सुरू राहतील, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा : अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षकाला कानाखाली मारली; बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेवर गुन्हा

central railway carry out midnight mega block for 5 day at panvel
हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा मेगा ब्लॉक, नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी पाच दिवसाचा वाहतूक ब्लॉक
passengers stuck in tutari express
पनवेलजवळ मालगाडी घसरल्याचा प्रवाशांना फटका, १० तासांपासून प्रवासी खोळंबलेल्या एक्सप्रेसमध्ये
dombivli railway station, people walking on the railway track
डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे मार्गातून प्रवाशांची ये-जा
kashedi tunnel open for ganpati
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचे अडथळे दूर, कोकणवासीयांना दिलासा; कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू

मगरपट्टा, मुंढवा गाव, मुंढवा चौक, लोणकर काॅलनी असा हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक या गाडीचा मार्ग आहे. रेल्वेच्या वेळेनुसार या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत, तर माळवाडी मांजरी, आव्हाळवाडी, सातव पार्क, वाघोली बाजार असा मुंढवा चौक ते केसनंद फाटा या गाडीचा मार्ग आहे. या मार्गावर दर एक तासाने गाडी सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा या माध्यमातून मिळणार असून, प्रवाशांनी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune pmpml buses to run on two new routes from today for railway passengers service pune print news apk 13 css

First published on: 22-09-2023 at 12:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×