scorecardresearch

पुणे : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने शाळेत निघालेल्या दोन सख्या बहिणींचा मृत्यू

लोणी काळभोर परिसरात शोककळा पसरली आहे.

पुणे : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने शाळेत निघालेल्या दोन सख्या बहिणींचा मृत्यू
घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन ट्रक सोडून चालक पसार झाला.

भरधाव ट्रकच्या धडकेने शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर परिसरात सकाळी घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघी सख्या बहिणी आहेत. शाळेत जात असताना सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर लोणी काळभोर परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणी ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली.

छकुली कुमार शितोळे (वय १७), राजश्री कुमार शितोळे (वय १०, दोघी रा. कवडीपाट, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, सोलापूर रस्ता) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ट्रकचालक परशुराम सुकेशवार महतो (वय २६, रा. सीतामढी, बिहार) याला अटक करण्यात आली.

लोणी काळभोर परिसरातील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कुलमध्ये छकुली अकरावीत शिकत होती. तिची लहान बहीण राजश्री सहावीत शिकत होती. दुचाकीस्वार छकुली आणि तिची लहान बहीण राजश्री सकाळी सातच्या सुमारास शाळेत जात होत्या. त्या वेळी लोणी रेल्वे स्थानक चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाला, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली. अपघातात सख्या बहिणींचा मृत्यू झाल्यानंतर लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात शोककळा पसरली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune two sisters on their way to school died when a truck hit their bike msr 87 svk

ताज्या बातम्या