वारजे परिसरात हॉटेलमध्ये जेवण न दिल्याच्या कारणावरून तीन सराईत गुंडांनी हॉटेलच्या कामगारांवर सशस्त्र हल्ला करून हॉटेलमधील रोकड लुबाडून नेली. हा प्रकार मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. यासंदर्भात चंद्रकांत हणमंतराव वरवटे ( रा. यशोदीप चौक, वारजे ) यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार मंगेश विजय जडितकर ( वय २३, रा. शिवणे ), सौरभ प्रकाश मोकर ( वय २२, रा. उत्तमनगर) आणि शुभम अनिल सुडेवार ( वय २५, रा. वारजे ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांच्याविरुद्ध यापूर्वी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे: टँकरच्या धडकेने महिलेचा मृत्यू; मांजरी भागातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरवाटे यांचे वारजे पुलाजवळ साई सरिता नावाचे हॉटेल आहे. रविवारी रात्री हॉटेल बंद झाल्यावर आरोपी तेथे गेले व त्यांनी जेवणाची मागणी केली. त्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी हॉटेल बंद झाले असून काहीही खाद्यपदार्थ शिल्लक नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने या तिघांनी समाधान ओव्हाळ, नदीम खा न नविकास झुंझार या कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला केला; तसेच हॉटेलच्या गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने घेऊन ते पसार झाले. यासंदर्भात फिर्याद दाखल झाल्यावर वारजे पोलिसांनी तपास करून तिन्ही आरोपींना पकडले. तपासासाठी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.